मेकिंग अ मर्डरर आणि क्रिमिनल जस्टीस सिस्टीम
पोलीस, कोर्ट, डिस्ट्रीक्ट अॅटर्नी, जज, तुमचा वकील, ज्युरी, फॉरेन्सिक लॅब, शास्त्रीय पुरावा आणि ही सगळी यंत्रणा चालवणारे शासन. प्रत्येक यंत्रणेत जिवंत, हाडामासाची आपल्यासारखीच भावना आणि संवेदना असणारी माणसं, त्यांचे पूर्वग्रह, विचार करण्याची पद्धत, प्रत्येक घटनेला आणि केसला असलेले विविध कंगोरे, त्यातील सगळे कंगोरे उघड 'न' करण्याचे स्वातंत्र्य, सरकारने केलेले आणि पूर्व न्याय-निवाड्यातून झालेले (कॉमन लॉ) कायदे. त्यांचे लावलेले अर्थ. आणि या सगळ्या जडङव्याळ व्यापातून होणारा निवाडा, बा इज्जत बरी किंवा उम्रकैद. मग त्याच कोर्टात किंवा पुढच्या कोर्टात परत पुनर्विचारार्थ याचिका, ती कुठल्या मुद्द्यावर? पहिल्या ट्रायलमध्ये काय चुकलं ज्यावर आता परत न्यायालयाने अपील दाखल करून घ्यावे? आणि हे असंच अनादि अनंत काळ चालू...
हे वाचूनच कोर्टाची पायरी का चढू नये म्हणत असतील याची थोडी फार कल्पना येतेच. एका माणसाच्या आणि पर्यायाने कुटुंबाच्या जीवनात १९८५ पासून आजता गायत हे चक्र चालू आहे. त्याने पहिली १८ वर्षे तुरुंगात घालवली, लैंगिक छळाच्या अपराधाखाली जो त्याने केलाच नाही. हे १८ वर्षांनी सिद्ध झालं. आणि आता? सध्या तो काय करतो?
त्याचं नाव आहे स्टीवन एव्हरी, मुक्काम मॅनोटोवॉक कौंटी, विस्कॉन्सिन, अमेरिका. सध्या वास्तव्य... येईलच पुढे.
यापुढील लेखन 'मेकिंग अ मर्डरर' या नेटफ्लिक्सवर गाजत असलेल्या आणि गेली कित्येक वर्षे मॅनोटोवॉक कौंटी, विस्कॉन्सिन येथे अनेक कारणांनी गाजलेल्या 'स्टीवन एव्हरी विरुद्ध विस्कॉन्सिन स्टेट' या केसबद्दल आणि तदनुषंगाने क्रिमिनल जस्टीस सिस्टीम बद्दल निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आहे. ही डॉक्युमेंटरी <a नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. पहिला भाग युट्युबवर ही उपलब्ध आहे. गुगल शोध घेतलात तर पानंच्या-पानं मत-मतांतरं वाचायला मिळतील. काहीही सर्च न करता डॉक्युमेंटरी बघणं शक्य असलं तर जरूर बघा, ही डॉक्युमेंटरी आरोपीच्या बाजूने आहे, असेही प्रवाद आहेत, त्यामुळे क्रिटिकली, सारासार विचार करून अवश्य बघा.
"Making A Murderer Title" by Source (WP:NFCC#4). Licensed under Fair use via Wikipedia - https://en.wikipedia.org/wiki/File:Making_A_Murderer_Title.jpg#/media/File:Making_A_Murderer_Title.jpg
*******स्पॉयलर अॅलर्ट ******
तुम्ही ही डॉक्युमेंटरी बघत असाल किंवा बघणार असाल तर इथेच थांबा, मी पूर्ण रहस्यचा उलगडा केलेला नाहीये, पण अनवधानाने काही रहस्यांचा उलगडा होऊ शकतो.
********\स्पॉयलर अॅलर्ट ******
विस्कॉन्सिन राज्यातील मॅनोटोवॉक कौंटीस्थित भंगारात काढलेल्या गाड्यांच्या धंद्यात ( कार सॅल्व्हेज यार्ड) असलेलं एव्हरी कुटुंब. स्टीव्हन गेली १८ वर्षे तुरुंगात आहे. त्याच्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. जो अपराध तो पहिल्या पासून नाकारत आलेला आहे, आणि ज्यामुळेच त्याला १८ वर्षांत एकदाही परो(ल) मिळालेला नाही. (विस्कॉन्सिन राज्याच्या नियमाप्रमाणे जर दोषी सिद्ध झालेल्या व्यक्तीने अपराध मान्य केला तरच त्याला परोल मिळतो, अन्यथा नाही). त्याची केस विस्कॉन्सिन निरपराध प्रोजेक्ट खाली परत विचारार्थ घेतली जाते. मूळ केसच्यावेळी उपलब्ध नसलेली आणि नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या डीएनए चाचणी द्वारे केसचा निकाल पूर्णपणे फिरतो, आणि स्टीव्हन एव्हरी निर्दोष सुटतो. १८ वर्षे तुरुंगात राहून स्टीव्हन एव्हरी निर्दोष बाहेर येतो, पण त्याचबरोबर आणखी काही रहस्यांचीही उकल होते. तो इतके दिवस आत होता, तरी त्या छोट्याश्या गावात लैंगिक अत्याचाराचे आणखी प्रकार घडतच होते, इतर दोषी पकडलेही जात होते, त्यातून आणखी माहिती मिळत होती, त्या माहितीचा वापर करून कुणाला चुकीने शिक्षा झाली असेल का? अशा निष्कर्षापर्यंत यंत्रणेतीलच काही लोक आलेही होते, पण हे सगळं गुलदस्त्यात ठेवणे, दाबून ठेवणे, वर येऊ न देणे हे एकूणच यंत्रणेला सोयीस्कर होतं आणि तसंच होत होतं.
भर तारुण्यातील १८ वर्षे आपल्या सहचारी आणि मुलांपासून दूर, बंदिवासात, ते ही अशा आरोपाखाली जो केलाच नाही, आणि आपण खरे आरोपी नाही हे सरकारला समजूनही जवळ जवळ ८ वर्षे ही माहिती दाबून टाकणारे लोक. सगळच बधीर करणारं. स्टीव्हने अर्थातच विस्कॉन्सिन राज्य आणि मॅनोटोवॉक कौंटीवर मल्टी मिलियन डॉलरची फिर्याद नोंदवली. त्याच्या सुनावणीला शेरीफच्या कार्यालयातील दिःगज लोकांना पाचारण करण्यात आलं, आणि काहीच दिवसांत त्या गावातून आणखी एक व्यक्ती गायब झाली. टेरेसा हॉलबॅक. एक तरुण छायाचित्रकार, जी गाड्या विकण्याच्या संकेतस्थळासाठी गाड्यांची प्रकाशचित्रे काढत असे. ती गायब होण्यापूर्वी तीन व्यक्तींना भेटली होती, त्यातील शेवटची व्यक्ती होती... स्टीव्हन एव्हरी.
आता टेरेसाचा पोलिसांनी घेतलेला शोध, पोलिसांना काहीही न सापडल्याने कम्युनिटीने हाती घेतलेली शोध मोहीम, त्यात तिची गाडी अचानक एव्हरी भंगारखान्यात सापडणे. स्टीव्हच्या घराचा, गराजचा अनेक वेळा पुन्हापुन्हा घेतलेला शोध. विविध लोकांच्या घेतलेल्या, न घेतलेल्या मुलाखती त्यातून समजणारे नानाविध कंगोरे. माहिती काढण्यासाठी पोलीस वापरत असलेल्या विविध क्लुप्त्या. त्यात हकनाकरित्या ओढले गेलेले कुटुंबातील इतर सदस्य, शोधमोहिमे अंतर्गत पोलिसांकडून घडलेल्या ढळढळीत चुका, त्रुटी. शेरीफ ऑफिस कॉन्फ्लीक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये असूनही त्यांनी केलेला सुरुवातीचा तपास, कोर्टात दिला जाणारा निवाडा म्हणजे<strong>च</strong> न्याय का केसची कायद्याअंतर्गत दिसणारी एक बाजू? या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आणि विस्कॉन्सिन राज्यातील क्रिमिनल जस्टीस सिस्टीम, ज्युरी ट्रायल आणि अनेक अनेक गोष्टी म्हणजे या सिरीयलचे उरलेले ९ भाग.
ही डॉक्युमेंटरी Laura Ricciardi आणि Moira Demos यांनी १० वर्षे शूट केल्येय. यात केस चालू असतानाचे कोर्टातील वाद-प्रतिवाद, त्या दिवसाच्या कामकाजानंतर माध्यमांनी दोन्ही बाजूंच्या घेतलेल्या मुलाखती, बातम्या, स्टीव्हनच्या वकिलांची, त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मतं, टेरेसाच्या भावाची मतं कायद्याच्या जाणकारांची मतं आणि सुत्रधाराची मतं असं बरंच काही आहे. शेवटी सुन्न, हताश व्हायला होतं.
ही डॉक्युमेंटरी बघत असताना, 'खूप त्रास होतोय पण बघणं सोडवत नाही' अशी परिस्थिती झाली माझी. डॉक्युमेंटरी एकांगी आहे, असं डीए (डीस्ट्रीक्ट अॅटर्नी) केन क्रॅट्झ यांच आणि मॅनोटोवॉक शेरीफ ऑफिसचं म्हणणं. दिग्दर्शकांनी त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केलेला.
यासगळ्या पार्श्वभूमीवर ज्युरी ट्रायल, पेटी ज्युरी, ग्रॅन्ड ज्युरी, अमेरिकेतील ब्रोकन क्रिमिनल जस्टीस सिस्टीम म्हणजे नक्की काय? ज्युरीनी निर्णय घेतला तो कायम असतो का? ज्युरी कसे आणि कोण निवडतं? ही पद्धत कितपत न्याय्य आहे? न्यायालयापुढे आलेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायाधीश फक्त निकाल देऊ शकतात, प्रत्यक्षात 'न्याय' करणं हे किती अप्राप्य असू शकतं? या पार्श्वभूमीवर कोणी कितीही भयानक गुन्हा केला असेल, तरी जोपर्यंत मानवी व्यवहार, भाव-भावना आणि साक्षी पुराव्यांवर निवाडा होणार आहे, तोवर फाशीची शिक्षा ही किती भयानक ठरू शकते? त्या अनुषंगाने सध्या रहातो त्या कॅनडातील, भारतातील न्याय निवाड्याची पद्धत काय आहे? त्याच्या खाचा खोचा काय इ. अनेक विषयांवर शोध घेणं चालू झालं.
ते सगळं वेळ मिळेल तसं लिहितो. तुम्हालाही काही माहिती असेल तर वाचायला आवडेल.

Comments
Post a Comment