Posts

Showing posts from January, 2016

मेकिंग अ मर्डरर आणि क्रिमिनल जस्टीस सिस्टीम

Image
पोलीस, कोर्ट, डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी, जज, तुमचा वकील, ज्युरी, फॉरेन्सिक लॅब, शास्त्रीय पुरावा आणि ही सगळी यंत्रणा चालवणारे शासन. प्रत्येक यंत्रणेत जिवंत, हाडामासाची आपल्यासारखीच भावना आणि संवेदना असणारी माणसं, त्यांचे पूर्वग्रह, विचार करण्याची पद्धत, प्रत्येक घटनेला आणि केसला असलेले विविध कंगोरे, त्यातील सगळे कंगोरे उघड 'न' करण्याचे स्वातंत्र्य, सरकारने केलेले आणि पूर्व न्याय-निवाड्यातून झालेले (कॉमन लॉ) कायदे. त्यांचे लावलेले अर्थ. आणि या सगळ्या जडङव्याळ व्यापातून होणारा निवाडा, बा इज्जत बरी किंवा उम्रकैद. मग त्याच कोर्टात किंवा पुढच्या कोर्टात परत पुनर्विचारार्थ याचिका, ती  कुठल्या मुद्द्यावर? पहिल्या ट्रायलमध्ये काय चुकलं ज्यावर आता परत न्यायालयाने अपील दाखल करून घ्यावे? आणि हे असंच अनादि अनंत काळ चालू... हे वाचूनच कोर्टाची पायरी का चढू नये म्हणत असतील याची थोडी फार कल्पना येतेच. एका माणसाच्या आणि पर्यायाने कुटुंबाच्या जीवनात १९८५ पासून आजता गायत हे चक्र चालू आहे. त्याने पहिली १८ वर्षे तुरुंगात घालवली, लैंगिक छळाच्या अपराधाखाली जो त्याने केलाच नाही. हे १८ वर्षांनी सिद्ध झालं...