मेपल लीफ ची ५० वर्षे
आज कॅनडाच्या झेंड्याला ५० वर्षे झाली. सध्याचा मेपल लीफ चा झेंडा १५ फेब्रुवारी १९६५ ला प्रथम 'पीस टॉवर' वर लावला. आटोवाच्या पार्लमेंट बिल्डींग वर रोज असे 5 झेंडे लावतात, एक पीस टॉवरवर, दोन इस्ट ब्लॉक आणि दोन वेस्ट ब्लॉक वर. 1994 पासून यातील पीस टॉवरवरचा झेंडा द-र-रो-ज बदलतात, आणि इतर दर आठवड्याला. तुम्ही कॅनडात राहणारे असाल आणि हे झेंडे तुम्हाला संग्रहात ठेवायला हवे असतील तर तुम्ही प्रतीक्षा यादीवर तुमचं नाव नोंदवू शकता. सध्याचा प्रतीक्षा काळ ४८ वर्षे आणि ३४ वर्षे, पीस टॉवर आणि इतर झेंड्यांना अनुक्रमे आहे. आजचा दिवस गुगल-डूडल नी असा सेलिब्रेट केला. कॅनडाचा झेंडा हा झेंडा अतित्वात येण्यापूर्वी Canadian Red Ensign हा कॅनडाचा ध्वज होता. १९६४ मध्ये लिस्टर बी पिअरसन पंतप्रधान असताना झेंडा बदलाविषयी बराच खल झाला आणि शेवटी लाल चौकोनात ११ टोकं असलेलं पांढरया पार्श्वभूमीवर मेपल लीफ हा 'रॉयल मिलिटरी कॉलेज ऑफ कॅनडा' च्या ध्वजावरून घेतलेला झेंडा नक्की झाला. आज १५ फेब्रुवारी 'राष्ट्रीय झेंडा दिन' म्हणून साजरा केला जातो. कॅनडाचा झेंडा लावण्यासाठी किंव...